Welcome

vikaschide.blogspot.in ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.!!! online कामासंदर्भात मदतीसाठी आमच्या ब्लॉगच्या contact Us या मेनुवर जाऊन Help For Teacher या Drop-down मेनुतील फॉर्म भरून आपल्या समस्या कळवा.शक्यतो आपल्या समस्याचे निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहो. बदली संदर्भात संपूर्ण माहिती Transfer मेनू मध्ये उपलब्द आहे.Specially Thanks To My Friends Mr. Pramod Dhengle, Founder Of Smartshikshak.blogsopt.in

मा.प्रदीप भोसले यांच्या Whatsapp पोस्ट

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११११*
*दिनांक* : *०९/१०/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡  *सर्व शिक्षक बांधवाना सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत बदली-संवर्ग-४ साठी फॉर्म भरण्यासाठीची अंतिम मुदत ही दिनांक ०७/१०/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत दिलेली होती,परंतु तांत्रिक अडचणीमुळे समाणिकरणाच्या याद्या प्रसिद्ध होण्यासाठी लागलेला वेळ लक्षात घेता ही मुदत दिनांक ११/१०/२०१७ सायं ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.तरी सर्व शिक्षकांनी आपले फॉर्म भरून वेरीफाय करावे.यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही.*

➡ *महत्वाची सूचना: संवर्ग-४ साठी सध्या पुढील जिल्ह्यांनाच लॉगिन उपलब्ध आहे.या जिल्ह्यातीलच शिक्षकांनी आपले फॉर्म भरावेत.*

*नंदुरबार,धुळे,जळगाव,बुलढाणा,अकोला,वाशिम,अमरावती,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर,यवतमाळ,नांदेड,हिंगोली,परभणी,जालना,औरंगाबाद,ठाणे,पुणे,रायगड,सोलापूर.*

*या व्यतिरिक्त जिल्ह्यांतील शिक्षकांना उद्या दुपारी १२ वाजेपासून लॉगिन उपलब्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी.*

➡ *यापूर्वी ceo लॉगिन ला दोन याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत.*

✏ १) जे शिक्षक संवर्ग-१,संवर्ग-२ व संवर्ग-३ मधील शिक्षकांच्या बदल्यांमुळे विस्थापित झालेले आहेत अशा शिक्षकांच्या नावांची यादी.
✏ २) समाणिकरनांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या नावांची यादी.

➡ *जिल्हा लेवल वरून रिक्त जागा व समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदांच्या बाबत भरलेल्या माहितीमध्ये चूक झालेली होती.सदर चुकलेली माहिती संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मधून दुरुस्त करून घेतल्याने आता या पूर्वी वर उल्लेख केलेल्या दोन्ही याद्यांमध्ये अंशतः बदल झालेला आहे.या दोन्ही अपडेटेड याद्या ceo लॉगिन ला आज नव्याने उपलब्ध करून दिलेल्या आहेत याची नोंद घ्यावी.त्यामुळे ही नवीन यादी सर्व शिक्षक बांधवांनी पहावी व आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून घ्यावी.*

➡ *समाणिकरणामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांची व संवर्ग-१,संवर्ग-२ व संवर्ग-३ च्या बदल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या यादीमध्ये अंशतः बदल झाल्याने व पसंतीक्रमामध्ये थोडाफार बदल झालेला असल्याने यापूर्वी संवर्ग-४ मध्ये ज्या शिक्षकांनी आपले फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व शिक्षकांना आपले फॉर्म दुरुस्त करून पून्हा भरण्याची एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.यासाठी संवर्ग-४ मधील सर्व शिक्षकांनी यापूर्वी भरलेले फॉर्म सिस्टिम द्वारे unverify करण्यात आलेले आहेत.तरी सर्व शिक्षकांना विनंती आहे की,आपण यापूर्वी भरलेले फॉर्म पुन्हा एकदा तपासावे.त्यात काही दुरुस्ती असेल तर ती करून घ्यावी.त्यानंतर पुन्हा एकदा आपला फॉर्म वेरीफाय करावा.आपण आपला फॉर्म वेरीफाय केला नाही तर आपली संवर्ग-४ मधून बदली होणार नाही,परंतु त्यानंतर आपली बदली संगणकाद्वारे घेतल्या जाणाऱ्या रँडम राउंड मध्ये होईल याची नोंद घ्यावी.*

➡ *जे शिक्षक यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या परंतु चुकलेल्या दोन्ही याद्यांपैकी एका यादीत होते.असे असताना त्यांनी संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरलेले आहेत परंतु आता प्रसिद्ध झालेल्या नवीन यादीत त्यांचा समावेश  नाही अशा शिक्षकांनी आपल्या बदली/फॉर्म बाबत अधिक काळजी करू नये.अशा शिक्षकांनी आपले फॉर्म delete करावेत.*

➡ *संवर्ग-४ मधील पूर्वीच्या यादीत नाव नव्हते.मात्र आज प्रसिद्ध झालेल्या नवीन यादीत नाव आहे अशा नव्याने समावेश होणाऱ्या शिक्षकांना मात्र आपले फॉर्म नव्याने भरावे लागतील याची नोंद घ्यावी.*

➡ *काही तांत्रिक अडचणीमुळे संवर्ग-४ साठी पुणे,ठाणे,रायगड व भंडारा जिल्ह्याचे लॉगिन सुरु होऊ शकलेले नव्हते ते आज  सुरु केलेले असून या जिल्ह्यातील शिक्षक बांधवांनीदेखील दिलेल्या अंतिम मुदतीत फॉर्म भरावयाचे आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *कोणत्याही कारणास्तव आपले फॉर्म भरावयाचे राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षकाची राहील,याची नोंद घ्यावी.ज्या कर्मचाऱ्याचा अर्ज संवर्ग-४ च्या यादीत असूनदेखील भरावयाचा राहिला तर अशा शिक्षकाला पुढील राउंड मध्ये घेतले जाईल याची नोंद घ्यावी.*

➡ *समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदांची विषयनिहाय आकडेवारी सध्या उपलब्ध नसल्याने संवर्ग-४ मधील पदवीधर शिक्षकांना फॉर्म भरताना जे पसंतीक्रम दिसतात त्यामध्ये भाषा,विज्ञान,सा.शास्त्र या तीनही विषयांची रिक्त जागा असलेल्या शाळांची नावे दिसून येत आहे.त्यामुळे आपला जो विषय आहे त्या विषयांची नेमकी शाळा कोणती आहे हे समजणे अडचणीचे होत आहे हे जरी खरे असले तरी सिस्टिम द्वारे त्या त्या विषयांची रिक्त जागा वेगळी दाखवणे शक्य नसल्याने अर्जदाराने त्या त्या शाळेची रिक्त जागेसंबंधी जिल्हा,तालुका,शाळा पातळीवर रिक्त जागा,बदली साठी मागणी केलेल्या शिक्षकांच्या विषयांची जागा इत्यादी बाबत चौकशी व अभ्यास करून पसंतीक्रम निवडावेत.तसेच आपणास २० शाळा पसंतीक्रमामध्ये असल्याने आपणास आपल्या पसंतीक्रमामधील शाळा नक्की मिळेल अशी अपेक्षा आहे.आपणास २० पसंतीक्रमामधील  शाळा न मिळाल्यास आपणास पुढील राउंड मध्ये संधी देण्यात येणार आहे,असे समजते.तरी सर्व पदवीधर शिक्षकांनी आपले फॉर्म भरून घ्यावेत.*

➡ *बऱ्याच जिल्ह्यांमध्ये संवर्ग-४ व समाणिकरणामुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांच्या नावाच्या pdf फॉरमॅट मधील याद्या whatsapp सारख्या सोशल माध्यमाच्या साहाय्याने शेअर होताना दिसून येत आहे.सदर यादी सर्व शिक्षकांना त्वरित समजावी यासाठी ही बाब आवश्यक आहे.परंतु काही व्यक्तीकडून मात्र संगणकाच्या मदतीने सदर याद्यांमध्ये हेतुपुरस्सर बदल करून शेअर केल्या जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आपल्या शिक्षक बांधवांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे.त्यामुळे यापुढे जेंव्हा बदलीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही याद्या या मा.अवर सचिव श्री.कांबळे साहेब यांच्या सहीचा वॉटर मार्क असलेली व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा मा.शिक्षणाधिकारी किंवा संबंधित काम पहाणारे सक्षम अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित असलेल्या याद्याच अंतिम असल्याचे समजावे.इतर कोणत्याही याद्यांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.*

➡ *सध्या बदलीसंदर्भात सोशल माध्यमामध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे.परंतु सर्व शिक्षक बांधवाना विनंती आहे की,अधिकृत माहितीशिवाय इतर कोणत्याही माहीतीवर विश्वास ठेवू नये.अशा माहितीमुळे होणाऱ्या आपल्या गैरसमजुतीमुळे आपला फॉर्म भरण्याची कार्यवाही ही अपूर्ण राहणार नाही याची काळजी घ्यावी.शासन स्तरावर बदली बाबतची कार्यवाही ही नियोजनबद्ध सुरु असून आपण देखील आपली कार्यवाही त्या प्रमाणे करावी ही विनंती.*

➡ *संवर्ग-४ चा फॉर्म भरताना पसंतीक्रम निवडताना अतिशय काळजीपूर्वक नोंदवावी.आपण निवडलेल्या पसंतीक्रमामधून जर आपणास बदली मिळाली नाही तर आपले नाव संगणकाद्वारे केल्या जाणाऱ्या रँडम राउंड मध्ये जाईल.त्यावेळी आपले पसंतीक्रम विचारात न घेता संगणक प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या रिक्त जागेवर आपली बदली होईल,याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-४ मधील पति-पत्नी एकत्रीकरण सुविधेचा लाभ घेऊन फॉर्म भरताना अर्जदाराच्या जोडीदाराला फॉर्म भरताना Do You want to take the benifit of Husband wife Unifiction/Aggregation? या टॅब मध्ये yes/no भरताना समस्या येत होती.खरं तर या ठिकाणी जोडीदाराने No असे नमूद करणे गरजेचे होते.परंतु ही बाब शिक्षक बांधवाना न समजल्याने गोंधळ निर्माण झालेला होता.आता हा गोंधळ होऊ नये म्हणून वरील टॅब समोर सिस्टिम द्वारेच No असे नमूद करून  सदर टॅब लॉक केलेली आहे,याची नोंद घ्यावी.या टॅब समोर आपणास जोडीदाराला आता काहीही करावयाची आवश्यकता नाही हे लक्षात घ्यावे.*

➡ *काही शिक्षकांनी चुकून संवर्ग-१/संवर्ग-२/संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरले होते परंतु सदर फॉर्म वेरीफाय न करता ड्राफ्ट मोड मध्ये सेव झालेले होते.त्या त्या वेळी असे फॉर्म delete करावे अशा सूचना दिलेल्या होत्या.परंतु संबंधित शिक्षकांनी योग्य कार्यवाही न केल्याने अशा शिक्षकांना आता संवर्ग-४ चा फॉर्म भरता येत नाही.परंतु संवर्ग-४ चा फॉर्म भरणे बंधनकारक असल्याने अशा शिक्षकांना संवर्ग-४ चा भरण्यासाठी सिस्टिम द्वारे उद्यापासून लॉगिन उपलब्ध करून दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *संवर्ग-४ मधील शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी व मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या.*
pradeepbhosale.blogspot.in

➡ *ज्या शिक्षकांना आपला फॉर्म भरताना काही अडचण निर्माण झालेली असेल अथवा काही शंका असतील अशा शिक्षकांनी egov.saral@gmail.com  ई-मेल id वर मेल करावा.आपल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.
-------/////---------///------/-/--------///---------/-----

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११०४*
*दिनांक* : *२८/०९/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता सदर पोस्ट वाचनातून नुकसान होऊ नये म्हणून सदर पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवाना सूचित करण्यात येत आहे की,आज सायंकाळ पासून राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी (पुणे वगळता) संवर्ग-४ मध्ये येणाऱ्या शिक्षकांसाठी फॉर्म भरण्यासाठीची सुविधा दिनांक ०२/१०/२०१७ दुपारी १ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पुणे जिल्ह्यासाठी ही सुविधा उद्यापासून  देण्यात येईल याची नोंद घ्यावी.*

➡  *संवर्ग-४ ची यादी ही संगणक प्रणालीद्वारे अतिशय काटेकोरपणे तयार करण्यात आलेली आहे.यात काही चुका होण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे.जर आपणास काही चुका वाटत असेल तर जिल्हा स्तरावरून ceo लॉगिन मधून जी माहिती सुरुवातीला भरलेली आहे त्यात काही चुका झालेल्या असण्याची शक्यता अधिक आहे.सदर यादीमध्ये दिसून येणाऱ्या काही शिक्षकांना असेही वाटू शकते की आपण पात्र नसताना देखील आपले नाव हे संवर्ग-४ च्या यादीमध्ये आलेले आहे,अशा शिक्षक बांधवांनी आपली अडचण लेखी स्वरूपात मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कळवावी.आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल याची नोंद घ्यावी.तसेच सदर अडचण आपण खालील ई-मेल वर देखील कळवावी जेणेकरून आपली समस्या टेक्निकलदृष्ट्या सोडवणे शक्य असेल तर ती देखील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू.*

                         *E-mail ID*

              *Egov.saral@gmail.com*

➡ *संवर्ग-४ मध्ये कोणते शिक्षक येतात?*

*संवर्ग-१,संवर्ग-२,संवर्ग-३ मधील शिक्षकांच्या बदलीमुळे विस्थापित झालेले  व शाळेमध्ये समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदामुळे विस्थापित झालेले असे सर्व शिक्षक या संवर्ग-४ मध्ये गणले जातात.*
   *या शिक्षकांची यादी ceo लॉगिन ला उपलब्ध करून दिलेली आहे.त्या मध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करून मगच आपल्या ट्रान्सफर पोर्टल मधील मुख्याध्यापक लॉगिन मधून संवर्ग-४ बदली फॉर्म म्हणजेच Transfer Under Consideration चा फॉर्म भरावा.सदर फॉर्म कसा भरावा हे समजून घेण्यासाठी आपणास माहितीस्तव मॅन्युअल उपलब्ध  करून देण्यात आलेले आहे.सदर मॅन्युअल वाचण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.सदर मॅन्युअल वाचून त्यानंतच सर्वांनी फॉर्म भरावे हॅव विनंती.*
 
                             *लिंक*

http://pradeepbhosale.blogspot.in/p/transfer-under-consideration.html?m=1


➡ *संवर्ग-४ अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांची यादी उद्या सकाळी १०:३० वाजता सर्व जिल्हा परिषदेच्या बाहेर दर्शनी भागात लावण्याच्या सूचना शासनाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या आहे.तरी अशा शिक्षकांनी उद्या सकाळी यादी पहावी व त्याप्रमाणे कार्यवाही करावी.*

➡ *संवर्ग-४ च्या शिक्षकांना यादी मधील आपले नाव पाहण्यासाठी उशीर होऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यांना सुचित करण्यात येत आहे की,सदर pdf यादी ही आपल्या जि.प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे अथवा whatsapp सारख्या सोशल माध्यमाच्या  साहाय्याने सदर यादी आजच सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पाठवण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत.काही कारणास्तव जर ceo लॉगिन द्वारे प्रसिद्ध झालेल्या याद्या सर्व शिक्षकांपर्यंत  पाहणे शक्य झाले नाही तर अशा शिक्षकांनी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगला भेट द्यावी.तेथे लवकरच सर्व जिल्ह्यांच्या संवर्ग-४ च्या शिक्षकांच्या याद्या पाहता येऊ शकेल याची नोंद घ्यावी.*

➡ *सोलापूर,लातूर,उस्मानाबाद,परभणी,बीड व जालना या सहा जिल्ह्यांना या पूर्वीच संवर्ग-४ मधील शिक्षकांना भरावयाचा फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे.या जिल्ह्यातील जवळजवळ सर्व शिक्षकांनी हा फॉर्म देखील भरलेला आहे.परंतू शासनाच्या सूचनेप्रमाणे या संवर्गात जि.प.शाळेतील पति-पत्नी शिक्षक एकत्रीकरण  या सुविधेचा लाभ देण्यात येणार असल्याने या फॉर्म मध्ये काही बदल केलेला असल्याने सोलापूर,लातूर,उस्मानाबाद,परभणी,बीड व जालना या सहा जिल्ह्यांतील शिक्षकांना या सुविधेचा लाभ प्राप्त व्हावा व पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळावी या हेतूने या जिल्ह्यातील ज्यां शिक्षकांनी संवर्ग-४ चा फॉर्म भरलेला आहे अशा सर्व शिक्षकांचे फॉर्म सिस्टिम द्वारे unverify दिलेले आहे,याची नोंद घ्यावी.या सर्व शिक्षकांनी आपण पति-पत्नी एकत्रीकरण या सुविधेचा लाभ घेणार असाल अथवा नाही त्याप्रमाणे नवीन option भरून फॉर्म पुन्हा एकदा वेरीफाय करावयाचा आहे.परंतु ज्या शिक्षकांनी संवर्ग-४ चा फॉर्म यापूर्वी भरलेला आहे अशा सर्वांनी आपला unverify केलेला फॉर्म पुन्हा verify करणे बंधनकारक आहे हे लक्षात घ्यावे.आपण आपला फॉर्म वेरीफाय न केल्यास आपण संवर्ग-४ मध्ये येत असून देखील आपणास या संवर्गात २० पसंतीक्रम निवडून त्या ठिकाणी बदली शासनाने करण्याच्या या सुविधेचा लाभ घ्यायची इच्छा नाही असे समजून आपली बदली  संगणक प्रणाली द्वारे रँडमली करण्यात येईल याची नोंद घ्यावी.रँडमली पद्धतीत मात्र आपणास कोणताही पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध नसेल.त्या वेळी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कोणत्याही शाळेत आपली बदली करण्यात येईल.सदर प्रक्रिया ही वेळोवेळी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे तसेच न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पार पडत आहे हे लक्षात घ्यावे.सदर प्रक्रियेचे कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळाजी घेतलेली आहे.आपणास काही शंका,अडचण असल्यास आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे लेखी कळवावी.आपल्या अडचणी संदर्भात शासन स्तरावर विचार करण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.*

➡ *आपल्या जिल्ह्याच्या ceo लॉगिन द्वारे भरलेल्या माहितीनुसार शासन बदली प्रक्रिया राबवत आहे.या माहितीमध्ये काही चुका झालेल्या असेल तर त्या प्रमाणे संगणक प्रणाली मध्ये देखील दिसून येतात.अशा वेळी बदली प्रक्रिया अधिकाधिक अचूक करण्यासाठी शिक्षकांनी भरलेले फॉर्म unverify करणे,त्यात काही बदल करणे असे निर्णय इच्छा नसताना घ्यावे लागतात.त्यामुळे बदली प्रक्रिया सुरु असेपर्यंत आपण संगणक प्रणालीच्या ट्रान्सफर पोर्टल व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनेकडे लक्ष ठेवावे,व त्याप्रमाणे कार्यवाही करावी.बदली प्रक्रिया सुरु असताना भविष्यात अशा प्रकारचे निर्णय वेळीवेळी घेतले जाऊ शकतात याची नोंद घ्यावी.त्या वेळी आपण प्राधान्याने तत्परतेने त्या वेळी दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे असेल हे लक्षात घ्यावे.*

➡  *वरील सहा जिल्ह्यातील संवर्ग-४ मध्ये यापूर्वी फॉर्म भरलेल्या शिक्षकांना विनंती आहे की,आज आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मध्ये नव्याने संवर्ग-४ मध्ये येणाऱ्या शिक्षकांची updated/सुधारित लिस्ट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्या लिस्ट मध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे सर्वप्रथम तपासून घ्यावे.जर आपले नाव त्या लिस्ट मध्ये असेल तर आपण या पूर्वी भरलेला फॉर्म जो सिस्टिम द्वारे unverify केला जाणार आहे तो फॉर्म पुन्हा एकदा तपासून घ्यावा.कदाचित त्यातील काही पसंतीक्रम सिस्टिम द्वारे कमी करण्यात आलेले असेल तर ते देखील चेक करावे.ceo लॉगिन ने त्यांनी भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती केल्याने आता आपणास अधिक पसंतीक्रम उपलब्ध झालेले आहे.त्यामुळे आता आपण आपले पसंतीक्रमात बदल देखील करू शकाल.आपला फॉर्म तपासून माहिती भरून पूर्ण झाला की आपण आपला फॉर्म पुन्हा एकदा वेरीफाय करावयाचा आहे हे लक्षात घ्यावे.ceo लॉगिन ला आज उपलब्ध होणाऱ्या नवीन दुरुस्त यादीमधून आपले नाव कमी झाले असेल तर आपण या पूर्वी भरलेला फॉर्म delete करावा व पुन्हा फॉर्म भरू नये.परंतु आज नव्यांने येणाऱ्या यादीमध्ये आपले नाव असले तर या यादीमधील म्हणजेच संवर्ग-४ मधील सर्व शिक्षकांनी आपला फॉर्म भरणे बंधनकारक आहे.*

➡  *जे पति-पत्नी दोघेही संवर्ग-४ मध्ये आलेले आहेत अथवा दोघांपैकी एक संवर्ग-४ मध्ये आलेला आहे अशा वेळी सदर शिक्षकासाठी आपली बदली पति-पत्नी एकत्रीकरण  अंतर्गत एक युनिट समजून करून  देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे.ही सुविधा जे पति-पत्नी जि. प.शाळेतील शिक्षक आहेत त्यांनाच देण्यात आलेली आहे.ज्या शिक्षकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे  त्यांनी फॉर्म भरताना दोघांनाही बदली साठी फॉर्म भरावा लागेल.हा फॉर्म कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती मॅन्युअल मध्ये देण्यात आलेली आहे.परंतु या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की जे शिक्षक या सुविधेचा लाभ घेतील त्यांना जर त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार बदली मिळाली नाही तर जिल्ह्यात ज्या ठिकाणी दोन शाळा ज्या ३० कि.मी च्या आत असेल अशा ठिकाणी त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल याची नोंद घ्यावी.एकदा या सुविधेचा लाभ घेण्याचे आपण नमूद केले व आपणास आपण दिलेल्या पसंतीक्रमाची शाळा मिळाल्या नाही तरीही आपण पुन्हा सदर सुविधेच्या लाभाचा निर्णय मागे घेऊ शकणार नाही,हे देखील लक्षात घ्यावे.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

---------///---/////-----------///---------/----------------
*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११०३*
*दिनांक* : *२८/०९/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता सदर पोस्ट वाचनातून नुकसान होऊ नये म्हणून सदर पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,संवर्ग-४ मध्ये येणाऱ्या शिक्षक बांधवांना बदली साठी फॉर्म भरण्यासाठी सर्व जिल्ह्यांना उद्यापासून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.सोलापुर,जालना,लातूर,परभणी,उस्मानाबाद,बीड या जिल्ह्यांमधील संवर्ग-४ च्या शिक्षकांना सध्या फॉर्म भरण्याची सुविधा दिलेली असली तरी या जिल्ह्यातील शिक्षकांना उद्या पासून इतर जिल्ह्यातील लॉगिन सोबत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.उद्या पासून इतर जिल्ह्यांसोबत आपण देखील नव्याने फॉर्म भरून शकाल याची नोंद घ्यावी. जिल्हा स्तरावर ceo लॉगिन ला माहिती भरताना झालेल्या चुकां दुरुस्त करण्यासाठी वेळ गेल्याने संवर्ग-४ साठी परवा (दोन दिवसांपूर्वी) उपलब्ध होणारे लॉगिन अखेर उद्या पासून सुरु करण्यात येत आहे.*

➡ *संवर्ग-४ मध्ये कोणते शिक्षक येतात?*

*संवर्ग-१,संवर्ग-२,संवर्ग-३ मधील शिक्षकांच्या बदलीमुळे विस्थापित झालेले  व शाळेमध्ये समाणिकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदामुळे विस्थापित झालेले असे सर्व शिक्षक या संवर्ग-४ मध्ये गणले जातात.या शिक्षकांची यादी उद्या ceo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्या मध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करून मगच आपल्या ट्रान्सफर पोर्टल मधील मुख्याध्यापक लॉगिन मधून संवर्ग-४ बदली फॉर्म म्हणजेच Transfer Under Consideration चा फॉर्म भरावा.सदर फॉर्म कसा भरावा हे समजून घेण्यासाठी आपणास माहितीस्तव मॅन्युअल देखील उपलब्ध उद्या सकाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट देऊन आपण मॅन्युअल डाउनलोड करून घेऊ शकाल.*
 
➡ *सोलापूर,लातूर,उस्मानाबाद,परभणी,बीड व जालना या सहा जिल्ह्यांना या पूर्वीच संवर्ग-४ मधील शिक्षकांना भरावयाचा फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे.या जिल्ह्यातील जवळजवळ सर्व शिक्षकांनी हा फॉर्म देखील भरलेला आहे.परंतू शासनाच्या सूचनेप्रमाणे या संवर्गात जि.प.शाळेतील पति-पत्नी शिक्षक एकत्रीकरण  या सुविधेचा लाभ देण्यात येणार असल्याने या फॉर्म मध्ये काही बदल केलेला असल्याने सोलापूर,लातूर,उस्मानाबाद,परभणी,बीड व जालना या सहा जिल्ह्यांतील शिक्षकांना या सुविधेचा लाभ प्राप्त व्हावा व पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळावी या हेतूने या जिल्ह्यातील ज्यां शिक्षकांनी संवर्ग-४ चा फॉर्म भरलेला आहे अशा सर्व शिक्षकांचे फॉर्म सिस्टिम द्वारे उद्या सकाळी unverify करून दिले जाणार आहे,याची नोंद घ्यावी.या सर्व शिक्षकांनी आपण पति-पत्नी एकत्रीकरण या सुविधेचा लाभ घेणार असाल अथवा नाही त्याप्रमाणे नवीन option भरून फॉर्म पुन्हा एकदा वेरीफाय करावयाचा आहे.परंतु सर्वांनी आपला unverify केलेला फॉर्म पुन्हा verify करणे बंधनकारक आहे हे लक्षात घ्यावे.आपण आपला फॉर्म वेरीफाय न केल्यास आपण संवर्ग-४ मध्ये येत असून देखील आपणास या संवर्गात २० पसंतीक्रम निवडून त्या ठिकाणी बदली शासनाने करण्याच्या या सुविधेचा लाभ घ्यायची इच्छा नाही असे समजून आपली बदली  संगणक प्रणाली द्वारे रँडमली करण्यात येईल याची नोंद घ्यावी.रँडमली पद्धतीत मात्र आपणास कोणताही पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध नसेल.त्या वेळी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कोणत्याही शाळेत आपली बदली करण्यात येईल.सदर प्रक्रिया ही वेळोवेळी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे तसेच न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पार पडत आहे हे लक्षात घ्यावे.सदर प्रक्रियेचे कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळाजी घेतलेली आहे.आपणास काही शंका,अडचण असल्यास आपण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे लेखी कळवावी.आपल्या अडचणी संदर्भात शासन स्तरावर विचार करण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.*

➡ *आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मध्ये भरलेल्या माहितीच्या आधारावर शासन शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवत आहे.सदर माहिती भरताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या तर त्याचा परिणाम सर्व प्रक्रियेवर पडतो.पहिल्यांदाच राबवत असलेल्या online प्रक्रियेमुळे अशा चुका त्यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात झाल्याचे दिसून आल्याने त्या चुका दुरुस्त करून घेऊनच आपल्या शिक्षक बांधवांची बदली प्रक्रिया करणे गरजेचे असल्याने सध्या संवर्ग-४ साठी लॉगिन उपलब्ध असलेल्या लातूर,बीड,सोलापूर,परभणी,जालना व उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ceo लॉगिन मध्ये माहिती भरताना झालेल्या चुका दुरुस्त करण्याची त्यांना संधी देण्यात आलेली होती.आपल्या जिल्हा प्रशासनाने आता या चुका दुरुस्त केलेल्या आहेत,याची सर्व शिक्षक बांधवांनी नोंद घ्यावी.या दुरुस्तीमुळे आता संवर्ग-४ मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या यादीवर देखील परिणाम पडण्याची शक्यता आहे.कदाचित काही शिक्षक संवर्ग-४ मध्ये येणार नाही किंवा काही शिक्षक संवर्ग-४ मध्ये नव्याने येऊ शकतील.परंतु दुरुस्त केलेल्या माहितीच्या आधारे संवर्ग-४ मध्ये येणाऱ्या शिक्षकांची संख्या पूर्वी पेक्षा बरीच कमी होणार असल्याचे दिसून येत आहे.*

➡ *आपल्या जिल्ह्याच्या ceo लॉगिन द्वारे भरलेल्या माहितीनुसार शासन बदली प्रक्रिया राबवत आहे.या माहितीमध्ये काही चुका झालेल्या असेल तर त्या प्रमाणे संगणक प्रणाली मध्ये देखील दिसून येतात.अशा वेळी बदली प्रक्रिया अधिकाधिक अचूक करण्यासाठी शिक्षकांनी भरलेले फॉर्म unverify करणे,त्यात काही बदल करणे असे निर्णय इच्छा नसताना घ्यावे लागतात.त्यामुळे बदली प्रक्रिया सुरु असेपर्यंत आपण संगणक प्रणालीच्या ट्रान्सफर पोर्टल व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनेकडे लक्ष ठेवावे,व त्याप्रमाणे कार्यवाही करावी.बदली प्रक्रिया सुरु असताना भविष्यात अशा प्रकारचे निर्णय वेळीवेळी घेतले जाऊ शकतात याची नोंद घ्यावी.त्या वेळी आपण प्राधान्याने तत्परतेने त्या वेळी दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे असेल हे लक्षात घ्यावे.*

➡  *वरील सहा जिल्ह्यातील संवर्ग-४ मध्ये यापूर्वी फॉर्म भरलेल्या शिक्षकांना विनंती आहे की,उद्या आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मध्ये नव्याने संवर्ग-४ मध्ये येणाऱ्या शिक्षकांची updated/सुधारित लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्या लिस्ट मध्ये आपले नाव आहे किंवा नाही हे सर्वप्रथम तपासून घ्यावे.जर आपले नाव त्या लिस्ट मध्ये असेल तर आपण या पूर्वी भरलेला फॉर्म जो सिस्टिम द्वारे unverify केला जाणार आहे तो फॉर्म पुन्हा एकदा तपासून घ्यावा.कदाचित त्यातील काही पसंतीक्रम सिस्टिम द्वारे कमी करण्यात आलेले असेल तर ते देखील चेक करावे.ceo लॉगिन ने त्यांनी भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती केल्याने आता आपणास अधिक पसंतीक्रम उपलब्ध झालेले आहे.त्यामुळे आता आपण आपले पसंतीक्रमात बदल देखील करू शकाल.आपला फॉर्म तपासून माहिती भरून पूर्ण झाला की आपण आपला फॉर्म पुन्हा एकदा वेरीफाय करावयाचा आहे हे लक्षात घ्यावे.ceo लॉगिन ला आज उपलब्ध होणाऱ्या नवीन दुरुस्त यादीमधून आपले नाव कमी झाले असेल तर आपण या पूर्वी भरलेला फॉर्म delete करावा व पुन्हा फॉर्म भरू नये.परंतु आज नव्यांने येणाऱ्या यादीमध्ये आपले नाव असले तर या यादीमधील म्हणजेच संवर्ग-४ मधील सर्व शिक्षकांनी आपला फॉर्म भरणे बंधनकारक आहे.*

➡  *जे पति-पत्नी दोघेही संवर्ग-४ मध्ये आलेले आहेत अथवा दोघांपैकी एक संवर्ग-४ मध्ये आलेला आहे अशा वेळी सदर शिक्षकासाठी आपली बदली पति-पत्नी एकत्रीकरण  अंतर्गत एक युनिट समजून करून  देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे.ही सुविधा जे पति-पत्नी जि. प.शाळेतील शिक्षक आहेत त्यांनाच देण्यात आलेली आहे.ज्या शिक्षकांना या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे  त्यांनी फॉर्म भरताना दोघांनाही बदली साठी फॉर्म भरावा लागेल.हा फॉर्म कसा भरावा याविषयी सविस्तर माहिती मॅन्युअल मध्ये देण्यात आलेली आहे.परंतु या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी की जे शिक्षक या सुविधेचा लाभ घेतील त्यांना जर त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार बदली मिळाली नाही तर जिल्ह्यात ज्या ठिकाणी दोन शाळा ज्या ३० कि.मी च्या आत असेल अशा ठिकाणी त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल याची नोंद घ्यावी.एकदा या सुविधेचा लाभ घेण्याचे आपण नमूद केले व आपणास आपण दिलेल्या पसंतीक्रमाची शाळा मिळाल्या नाही तरीही आपण पुन्हा सदर सुविधेच्या लाभाचा निर्णय मागे घेऊ शकणार नाही,हे देखील लक्षात घ्यावे.*

*काही शिक्षकांनी चुकून संवर्ग-१/संवर्ग-२/संवर्ग-३ मध्ये फॉर्म भरले होते परंतु सदर फॉर्म वेरीफाय न करता ड्राफ्ट मोड मध्ये सेव झालेले होते.त्या त्या वेळी असे फॉर्म delete करावे अशा सूचना दिलेल्या होत्या.परंतु संबंधित शिक्षकांनी योग्य कार्यवाही न केल्याने अशा शिक्षकांना आता संवर्ग-४ चा फॉर्म भरता येत नाही.परंतु संवर्ग-४ चा फॉर्म भरणे बंधनकारक असल्याने अशा शिक्षकांना संवर्ग-४ चा भारण्यासाठी सिस्टिम द्वारे लॉगिन उपलब्ध करून दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

-------------//---// -------///---/------///----////--------
*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११००*(दुरुस्ती)
*दिनांक* : *२४/०९/२०१७*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाचे*
➡ *काल पाठवलेल्या ११०० नंबरच्या सुचनेमध्ये काही बदल करून ही पोस्ट पुन्हा पाठवली जात आहे.कृपया बदली प्रोसेस मध्ये असलेल्या बांधवांनी वाचून घ्यावी.* __________________________________________

➡  *सर्व शिक्षक बांधवाना सुचित कारण्यात येते की,काही तांत्रिक कारणास्तव काल सकाळपासून काही काळ जिल्हाअंतर्गत बदली मधील संवर्ग-३ च्या शिक्षकांना आपला बदलीसाठीचा फॉर्म भरताना Data entry For this District is Currently Closed असा एरर येत होता.परंतु सदर अडचण  काल दुपारी दूर करण्यात आलेली आहे.या अडचणीमुळे काही शिक्षकांना फॉर्म भरताना अडचण निर्माण झालेली होती.तांत्रिक अडचणीमुळे वाया गेलेला वेळ व त्यामुळे फॉर्म भरू न शकल्याने होणारे नुकसान या सर्व बाबींचा विचार करून संवर्ग-३ चा फॉर्म भरण्याची काल सायंकाळी संपणाऱ्या मुदतीत वाढ देण्यात आलेली असून आता संवर्ग-३ चा फॉर्म आज दुपारी १२ वाजेपर्यंत आपण भरू शकाल याची नोंद घ्यावी.*

➡ *वरील समस्या ही सर्व्हर मध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे आलेली होती.ही अडचण अद्याप देखील काही शिक्षक बांधवाना येऊ शकते.ही अडचण आल्यास आपण खालील पद्धतीचा अभ्यास करावा व आपला फॉर्म भरावा ही विनंती.*

➡ *जेंव्हा आपण www.edustaff.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्याल तेंव्हा पहिल्याच पानावर सर्वात शेवटी खालच्या बाजूला आपण ज्या सर्व्हर वर काम करत आहात त्या सर्व्हर चा नंबर दिसून येतो.*
*उदा. 111 , 113*

➡ *जेंव्हा जेंव्हा आपण ब्राऊजर बंद करून पुन्हा सुरु कराल तेंव्हा तेंव्हा आपण त्याच किंवा वेगवेगळ्या सर्व्हर वर जात असतो.असे अनेक सर्व्हर पोर्टल साठी कार्यरत आहे.परंतु काही सर्व्हर वर तांत्रिक अडचण उद्भवल्याने वरील Data entry For this District is Currently Closed  असा error येत आहे.तरी आपण जेंव्हा जेंव्हा पुढील सर्व्हर दिसून येईल त्यानंतरच ट्रान्सफर पोर्टल लॉगिन करून पुढील काम करावे.या मध्ये 189, 231, 241, 113, 111, 112  हे सर्व्हर सुरु असून या व्यतिरिक्त सर्व्हर नंबर आल्यास आपले ब्राऊजर बंद करा व पुन्हा सुरु करा.त्यानंतर जर वर उल्लेख केलेले सर्व्हर नंबर दिसून आले तरच पुढे काम सुरु करा अन्यथा सदर नंबर येईपर्यंत पुन्हा ब्राऊजर बंद-सुरु ही प्रोसेस सुरु ठेवा.सदर समस्या आज सकाळी १०:०० वाजता दूर होणे अपेक्षितआहे याची नोंद घ्यावी.*

➡ *अवघड क्षेत्रात शाळा मॅप केलेली आहे परंतु सदर अवघड शाळेत शिक्षकांची संख्या declare न केल्याने अशा शिक्षकांना आता फॉर्म भरताना 0(zero) vacancy चा error येत आहे.अशा शिक्षकांच्या बाबतीत शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आज माहिती मागावलेली आहे याची नोंद घ्यावी.या माहितीवरून अशा शिक्षकांच्या बाबतीत पुढे काय कार्यवाही करावी यासंदर्भात विचार केला जाणार आहे,हे लक्षात घ्यावे.*

➡ *लातूर, जालना, परभणी, बीड, सोलापूर व उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी संवर्ग-४ चा फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.संवर्ग-४ मध्ये फॉर्म  भरताना संवर्ग-२ मध्ये फॉर्म भरण्यासाठी पात्र नसलेले कर्मचारी (३० कि.मी च्या आत असलेले पति-पत्नी शिक्षक)यांना आपल्या जोडीदारापासून जवळची शाळा देण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येणार असल्याने अशा शिक्षकांसाठी आजपासून फॉर्म मध्ये एक नवीन सुविधा सुरु करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे अशा पती-पत्नी शिक्षकांनी संवर्ग-४ चा फॉर्म तूर्तास भरू नये.या संदर्भात वरिष्ठ स्तरावर आज निर्णय घेण्यात येणार असून त्यानंतर आपणास सूचना करण्यात येईल.त्यानंतर आपण फॉर्म कशा पद्धतीने भरावा यावर विचार करावा ही विनंती...अशा प्रकारच्या ज्या शिक्षकांनी (३० कि.मी च्या आत असलेले पति-पत्नी शिक्षक) यांनी संवर्ग-४ चा फॉर्म भरून वेरीफाय केलेला असेल तर अशा अर्जदारास देखील ती दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकेल याची नोंद घ्यावी.कृपया याबाबत निर्णय झाल्यास आपणास कळविण्यात येईल.यासाठी पुढील सुचनेची वाट पहावी.सदर सूचना ही फक्त सध्या लॉगिन उपलब्ध असलेल्या वरील सहा जिल्ह्यातील संवर्ग-४ मधील शिक्षक पतिपत्नी यांच्यासाठीच असून इतर शिक्षकांनी संवर्ग-४ चा फॉर्म भरण्यास काही अडचण नाही आहे हे लक्षात घ्यावे..*

➡ *बीड व लातूर जिल्ह्यात ceo लॉगिन मधून चुकीच्या पद्धतीने भरलेल्या माहितीमुळे काही शिक्षकांना फॉर्म भरताना अडचण निर्माण झालेली असून सदर समस्या वरिष्ठ स्तरावर कळविण्यात आलेली असून या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागावलेले आहे.या संदर्भात आज सविस्तर सूचना देण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.तरी ज्या शिक्षकांना फॉर्म भरताना अडचण येत आहे अशा शिक्षकांनी संयम राखावे व मानसिक त्रास न घेता पुढील सुचनेची वाट पाहण्याचे आवाहन मा.सचिव महोदय श्री.असिम गुप्ता साहेब,मा.भालेराव साहेब,मा.कांबळे साहेब यांनी केलेले आहे.कोणत्याही संवर्गातील कोणत्याही शिक्षकाची बदली प्रक्रियेमध्ये गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे याची नोंद घ्यावी.*

➡ *मित्रानो,विविध अडचणीला सामोरे जाऊन आपली online बदली प्रक्रिया पूर्णत्वास जात आहे.आज ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.ही online बदली प्रक्रिया ही एक ऐतिहासिक प्रक्रिया ठरणार आहे.आपण या अशा पारदर्शक बदली प्रक्रियेला पहिल्यांदाच राबवत आहोत.अशा वेळी प्रशासनाकडून,शिक्षक बांधवांकडून थोड्या फार प्रमाणात चुका होण्याची शक्यता सहाजिक आहे.अशा वेळेला आपण सर्वांनी सर्वांच्या सहकार्याने ही प्रक्रिया पार पाडणे हे आपले कर्तव्यच म्हणावे लागेल.या प्रक्रियेत काही शिक्षक मित्राची गैरसोय होणार असली तरी आपलेच काही शिक्षक बांधव वर्षानुवर्षे अवघड,दुर्गम क्षेत्रात काम करत आहेत त्यांना व त्यांच्या कुटुंबांना,मुलांना सुगम क्षेत्रात राहण्याचा आनंद या online बदली प्रक्रियेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर पाहताना आपल्या गैरसोईबाबत अधिक काही वाटणार नाही याची मला खात्री वाटते.जे शिक्षक या बदली प्रक्रियेमुळे अवघड क्षेत्रातील शाळेत जाणार आहेत असे असले तरी पुन्हा तीन वर्षांनंतर आपण सुगम क्षेत्रात येण्यासाठी पात्र होऊ शकतो त्यामुळे भविष्यात पार्दशक व अचूक बदली प्रक्रिया पहावयाची असेल तर एवढा त्याग आपण नक्कीच करू शकतो.या पोस्ट च्या निमित्ताने सर्वांना आवाहन करू इच्छितो की,online बदली प्रक्रिया सर्वांना सोबत घेऊन कोणत्याही परिस्थितीत पार पाडली जाणार आहे.त्यामुळे आता संपूर्ण बदली प्रक्रिया थांबवण्याचे आश्वासन देऊन काही मंडळी नको त्या गोष्टी करत असल्याचे दिसून येत आहे.गरजेपोटी आपले बांधव देखील याला बळी पडत आहेत जे अतिशय दुर्दैवी आहे. तरी सर्वाना विनंती आहे की,कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपले शैक्षणिक कार्य सुरू ठेवावे.बदली प्रक्रिया ही एक कार्यालयीन बाब असून यापेक्षा या घटनेला अधिक महत्व देऊ नये असे मला वाटते.बाकी आपण सुज्ञ आहातच.धन्यवाद...*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 ```Disclaimer``` : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.